STUDY MATERIAL (Free PDF) By CMO

Description

● आयोगाची चौकट 65+ गुणांच्या तयारीसाठी...

कम्बाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025-26 समोर ठेवून या 'आयोगाच्या चौकटीची' निर्मिती केली आहे. मागील पाच वर्षातील विषय आणि वर्षनिहाय विचारलेले प्रश्न यांचे सूक्ष्म विश्लेषण केले आहे. शेवटच्या काही दिवसात नक्की कोणत्या उपघटकांची रिव्हिजन करायची याची कल्पना तुम्हाला यातून येईल. 
प्रत्येक विषय आणि विषयातील कोणते उपघटक महत्त्वाचे आहेत हे मागील वर्षांच्या प्रश्नांतून तुम्हाला समजून येईल. प्रत्येक परीक्षेमध्ये मागील वर्षांच्या प्रश्नाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. साधारणपणे मागील 5 वर्षातील PYQ अभ्यआसणे आवश्यक आहे.
PYQ विश्लेषण म्हणजे फक्त प्रश्न आणि उत्तर वाचणे नव्हे, इतर चुकीच्या पर्यायांचे परीक्षाभिमुख विश्लेषण करणे गरजेचे आहे. 2011 ते 2020 या दहा वर्षातील PYQ तुम्ही बाजारातील कोणत्याही चांगल्या पुस्तकातून वाचू शकता. 2020 ते 2024 या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून आयोगाच्या वेळेप्रमाणे एका तासात सोडवून पाहणे आवश्यक आहे, यावरून तुम्हाला आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड कसा बदलत जातोय या गोष्टी समजायला मदत होईल.
सर्वच विषयातील ज्या उपघटकांवरती जास्त प्रश्न आलेले आहेत, अशा उपघटकांची जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. सामान्य अध्ययनाच्या सर्व विषयासोबतच चालू घडामोडींच्या प्रश्नांचे सुद्धा या पीडीएफच्या माध्यमातून विश्लेषण तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. येणाऱ्या पूर्व परीक्षेत 65+ गुण मिळविण्यासाठी ही 'आयोगाची चौकट' महत्त्वाची ठरेल.

Team CMO

STUDY MATERIAL (Free PDF) By CMO

Have a coupon?